लातुर् जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
निलंगा.- पोलीस स्टेशन निलंगा हद्दीतील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी वेळअमावस्या सण आहे. प्रत्येक घरातील लहान मोठे महिला पुरुष शेताकडे जात असतात व शहर गावे घरे व गल्ल्या नीमनुष्य होतात यामुळे घरातील चोऱ्या होण्याची दाट शक्यता असते म्हणून आपापल्या घरातील दाग दागिने सोने नाणे व मूल्यवान वस्तू व्यवस्थित ठेवावे किंवा सोबत घेऊन जावे. अथवा प्रत्येकी एक माणूस घरात राहील याची दक्षता घ्यावी.असे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.



