अकोला: विवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या.
अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात फाशी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. उमा अमोल तेलगोटे (रा. रिधोरा ता. बाळापूर) असे या विवाहितेचे नाव असून तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे. मयताचा भाऊ सचिन वामन तांबरे (रा. विवरा ता. पातूर) याने या घटनेला मयताचे पती अमोल तेलगोटे आणि त्याचे सर्व कुटुंबीय जबाबदार असल्याचे तक्रारीत सांगितले.


