अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर..
जिल्ह्यातील बाळापूर व अकोट तालुक्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोनजण ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. बाळापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी (गवळी) फाट्याजवळ चारचाकी व कंटेनरच्या अपघातात एक ठार, तर चारजण जखमी झाले. कंटेनर क्रमांक (एम. एच. ४० बीजी ५३४५) व चारचाकी क्रमांक (एम. एच. २७ एआर १९२४) ची धडक झाली. या अपघातात उमजी उर्फ बाल्या याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. बाळापूर पोलिस स्टेशनला दीपक सावलकर यांनी चालकाविरुद्ध तक्रार दिली.


