दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा
पुसद प्रतिनिधी:- सिद्धार्थ कदम
पुसद : मौजा मोहा ( इ) येथील स्मशानभूमी च्या जागेवर दफन करित असल्यामुळे त्याच ठिकाणी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देणे बाबतचे निवेदन मा तहसिलदार साहेब यांना देण्यात आले
मोहा येथील समस्त गावकरी रहवाशी असून पूर्वीवासूनच मौजा मोहा येथे स्मशानभूमी चे शेड नसल्यामुळे शेत सर्वेनंबर जूना फेरफार क्रं 368 हा असून नविन 224 हा आहे स्मशानभूमी ची जागा असतांना तलाठी यांचेशी संगनमत करून काही दिवसांपूर्वी जागेत अंत्यविधी करण्यास आडकाठी करत आहे सदर ही जागा 4 पिढ्यापासून स्मशानभूमी साठी उपयोगात होती परंतू कोणतेही कारण नसतांना आज रोजी दफन करण्यास सक्त मनाई करत आहेत वास्तविक पाहता गावठाण च्या जागेवर अप्पा बाबा मनवर यांनी अतिक्रमण करून ताबा केला आहे तरी त्या स्मशानभूमी ची सखोल चौकशी करून केलेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे व स्मशानभूमीचे नविन शेड करून देण्यात यावे या करिता दि 4 / 11 / 24 रोजी तक्रार दाखल केली होती त्यानंतर त्याच तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दि 17/12/24 रोजी पत्र देण्यात आले होते परंतू अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आल्याचे आढळून आले नाही त्या दोन्ही अर्जाच्या अनुषंगाने मा तहसिलदार साहेब यांनी अर्जदार गावकरी यापैकी 5 लोकांना दि 18 / 12/ 24 रोजी नोटीस देवून 27 / 12 / 24 रोजी आपले काय म्हणणे आहे हे कार्यालयात सादर करावे अशी सुचना या पत्रात देण्यात आली होती त्या अनुषंगाने समस्त गावकरी दि 27 / 12/ 24 रोजी मा उपविभागीय कार्यालय पुसद व मा तहसिलदार कार्यालय पुसद येथे हजर होवून स्मशानभूमीची मागणी चे निवेदन देण्यात आले
सदर तक्रारी ची दखल 8 दिवसांच्या आत न घेतल्यास वरूड येथे लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला.


