अकोला विभाग:- गणेश वाडेकर
तेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे बसथांब्यावर तेल्हारा पोलिसांनी आज अवैध देशी दारू जप्त केली. पोलिसांनी विनापरवाना देशी दारू विक्रीकरिता घेऊन जाणाऱ्या सागर सुरेश सुलाखे (३२) याच्या ताब्यातून १४०० रुपये किमतीची दारू जप्त केली. फिर्यादी पोलिस हवालदार अमोल सोळंके व पोलिस हवालदार श्यामसुंदर पेंदरे दहीगाव बिटमध्ये- गस्तीवर असताना आरोपीस रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


