सातारा विभाग:- निलेश् कोकणे (माण)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज कॅॅबिनेट मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे ( भाऊ ) यांचे सातारा जिल्ह्यात भव्य दिव्य असे संपूर्ण जनतेच्या वतीने स्वागत करण्यात आले.जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. डीजे च्या दणक्यात जय हो गाण्याने संपूर्ण जनसमुदयाने मनातील आनंद व्यक्त केला. तर ढोल ताश्यांच्या गजरात भव्य अशी रॅली काढण्यात आली.माण खटावच्या इतिहासात प्रथमच भाऊंच्या रूपाने या मतदार संघाला अतिशय महत्वाचे कॅॅबिनेट मंत्रिपद आणि खाते मिळाले आहे. या माण खटावच्या मातीचा आणि येथील समस्त जनतेचा मान सन्मान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र राज्याचे जनप्रीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राखला. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.भाऊंनी गेली 15 वर्ष केलेली जनसेवा. दुष्काळ हटविण्यासाठी घेतलेली मेहनत. प्रत्येक गावातील विकासकामे. जनतेसाठी अहोरात्र झटणारा नेता. संपूर्ण माता भगिनींचा भाऊ. तरुण पिढीला आदर्श वाटणारा नेता. कोणताही भेदभाव न करणारा नेता. प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारा नेता. माण खटावच्या मातीला पाणी देणारा नेता. म्हणून आपली ओळख निर्माण करणारे जलनायक आमदार म्हणून संपूर्ण जनता ओळखते. या संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच जनतेले सलग चौथ्यांदा भरगोस मतांनी श्री जयकुमार गोरे भाऊंना निवडून दिले. पक्षाने त्यांच्या या सर्व कौशल्यच अनुभव पाहून खूप मोठी जवाबदारी नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांना दिली आहे.नक्कीच भाऊ या संधीने माण खटावचे जसे नंदनवन केले आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे पण नक्कीच करतील अशी खात्री आहे.


