अकोला विभाग:- गणेश वाडेकर
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील हेंडज फाट्याजवळ मालवाहू ट्रक डिव्हायडरला धडकून उलटल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. हा थरारक अनुभव या महामार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी घेतला असून, सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवित हानी झाली नसली तरी ट्रकमधील साहित्य व ट्रक बेचीराख झाल्याने मोठे नुकसान झाले. ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


