गणेश राठोड जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
राज्य शासनाने स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात आमदार हेमंत पाटील त्यांनी विधान परिषदेमध्ये विशेष उल्लेखाद्वारे केली आहे. विधानपरिषद सभागृहात ही मागणी पटलावर ठेवून पुढीलउचित कार्यवाहीसाठी सभागृहाने सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले आहे. राज्यामध्ये सद्यस्थितीत १४० पेक्षा जास्तविधानपरिषदेमध्ये विशेष उल्लेखाद्वारे मागणीपत्रकार संघटना काम करतात, पण त्यांना काम करत असताना मर्यादा येतात. आजस्थितीत लाखो पत्रकार प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रत्यक्ष काम करत आहेत. त्यासोबतच पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या पत्रकारांची संख्या पण उल्लेखनीय असूनही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच त्यांच्या सरक्षेचा प्रश्न सद्धा महत्वाचाआहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पत्रकार बांधव सातत्याने काम करत असतात. परंतु त्यांच्या मागण्यांची दखल कुठे कोणी घेताना दिसत नाही. पत्रकारांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी त्यांना स्वतःच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत.


