अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
तेल्हारा शहरातील जय भवानी चौक येथील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली. देविदास सदाशिव पातोडे हे मुलाकडे पुण्याला गेले होते. *घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लक्ष्मीची चांदीची मूर्ती, चांदीचा कर्दोळा, रोख ५५ हजार रुपये असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला*. पातोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


