वर्धा माहिती संकलन विभाग:-आजच्या तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन, यूट्यूब, फेसबुक, सिनेमा यांच्या मुळे तसेच कुटूंबात समाजात,शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अतिशय अल्पवयीन मुलगा मुलगी प्रेमात पडून त्यांच्यात शारीरिक संबध निर्माण होऊन कुमारी मातांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे आज या मुला मुलींचे शालेय पातळीवर समुपदेशन करण्याची गरज आहे कारण अल्पवयीन मुला मुलींचे प्रेमसंबंध हि सामाजिक समस्या निर्माण झाली आहे असे मत केन्द्र सरकार पुरस्कृत महिला व बाल कल्याण विभागाच्या अन्तर्गत चालणा-या सखी वन स्टॉपच्या प्रशासक रेश्मा रघाटाटे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन वयात प्रेम करणारे कायदेशीर वयात आलेल्या किशोर अनुराग मेटे आणि निकिता बॅरिस्टर भारती दोघेही कोल्हापूर यांचे आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाह आयोजित कार्यक्रमात आपले स्पष्ट मत व्यक्त केले किशोर व निकीता हे शालेय विद्यार्थी असतांना ओळखितून प्रेमात पडले याची कुणकुण निकिताच्या घरच्यांना लागताच त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रेम आंधळे असते त्यांना सर्व जगच प्रेमाचे शत्रू दिसतात अशा वेळी समजावाण्याचा कोणताही परिणाम यांच्यावर होत नाही उलट सारे जगच आपले वैरी असे समजून दोघेही सिनेमा स्टाईलने आत्महत्या करतात किंवा घरून पळून जातात व घात लावून बसलेल्या समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांच्या अलगद हाती पडतात निकिता व किशोर विरोध होताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले यांच्या कडे पळून आले कारण अरूण भोसले याचा किशोर हा मेहूणा त्यांनी लगेच राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांची दोघांसह भेट घेतली व लग्न लावून देण्याची विनंती केली दोघांचेही कागदपत्रे तपासल्यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू होतो हे लक्षात आले कायदेशीर समुपदेशन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड दुर्गा प्रसाद मेहरे याचा कायदेशीर सल्ला घेतला तिकडे निकिताच्या घरच्यांनी पोलिस तक्रार दिली पोलिस कार्यवाही पासून वाचण्यासाठी व पुढील अनर्थ टाळण्यासाठी सखी वन स्टॉप सेन्टरच्या प्रशासक यांची मदत घेऊन निकिताला सेन्टर मध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही करून दाखल केले पोलिस येवून दोघांनाही कुटूंबाच्या उपस्थितीत लग्नाचे वय झाल्यावर लग्नं लावून देवू असे सांगून घेऊन गेले निकिताचे वय 18 व किशोर चे वय 21 झाल्यावर ठरल्याप्रमाणे या प्रेमीयुगुलांचे लग्न म.ज्योतीबा फुलेंच्या सत्यशोधक विवाह पध्दतीने मान्यवर व उपस्थितांच्या उपस्थित लावून देण्यात आले लग्नाची सर्व कायदेशीर बाबी गजेंद्र सुरकार यांनी करून घेतल्या तर लग्नाचे सोपस्कार वर्धा वर्धन हाट झुनका भाकर केन्द्राचे सभागृह येथे प्रशिक्षण विभागाच्या डॉ माधुरी झाडे, डॉ हरिश पेटकर, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले ज्योती भोसले यांनी पार पाडले कार्यक्रमाच्या मंचावर यावेळी सखी वन स्टॉपच्या प्रशासक रेश्मा रघाटाटे,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनय डहाके कुभंलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंदु पोपटकर, वर्धा वर्धन हाट चे संचालक मोहन खैरकार,माजी जिल्हाध्यक्ष डॉ सिध्दार्थ बुटले राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले तर प्रस्ताविक राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाहूणे, गणेश चौधरी विधान, डॉ मंजुषा देशमुख, गुड्डू देशमुख यांनी परिश्रम घेतले.


