गणेश राठोड जिल्हा प्रतिनिधी / यवतमाळ
ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यास नागरिकांवर करवाढीचा बोजा लादेल हे नागरिकांना माहित असताना सुद्धा ढाणकी नागरिक यामुळे खुश होते की,आता आपल्या ढाणकी गावचे शहरीकरण होऊन आपल्या गावाचा विकास होईल, गावात कधी नव्हे स्त्री- पुरुष साठी संडास बाथरूम होईल, पाण्याची समस्या सुटून शुद्ध पाणी मिळेल, आरोग्य सुविधा मिळेल म्हणून सगळे नागरिक नगरपंचायत झाल्यास करवाढ झाली तरी , त्याचे फायदेही मोठे मिळतील . सरपंच चा मुख्याधिकारी दर्जाचा प्रथमश्रेणी अधिकारी मिळाल्याने विकासकामांना चालना मिळेल . शासनाकडून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी व अनुदाने मिळतील . राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना मिळतील . आरोग्य, अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, नगरविकास, अग्निशमन आदी विभाग सुरू झाल्याने गावाचा नियोजनबद्ध विकास होईल . विविध योजना आणि विकासप्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर अवलंबून रहावे लागनार नाही.घरपट्टी, दिवाबत्ती कर वाढले तरी महसुलातही वाढ होईल .पण ढाणकी शहरचा विकास होईल. पण हे सर्व काही ढाणकी गावाला लाभले नाही त्त्यांच्या पदरी फक्त सरपंच ठिकाणी मुख्याधिकारी दर्जाचा प्रथमश्रेणी अधिकारी मिळाला पण सुविधा सोडून अतिरिक्त कर शिवाय ढाणकी जनतेला पुढील वर्षा साठी अतिरिक्त कर मिळाला आहे.ढाणकी शहर काँग्रेस कमिटी आता विकास सोडून नागरिकांवर लादणारा नवीन कर विरोधात पेटली असून त्यांनी नगरपंचायत ढाणकी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे की, नगरपंचायत ने आपल्या कार्यालया अंतर्गत सन 2025/2026 च्या संकल्पमध्ये ढाणकी येथील नागरीकांच्या मालमत्तेतर 26%. इत्तर कर लावलेले आाहेत शैक्षणिक कर, रोजगार हमी कर, वृक्ष कर इत्यादी व वाढीव कर. सध्याच्या दुष्काळ सदृष्य परिस्थिती महागाई, बेरोजगारी, शेती पिक योग्य भाव मिळत नसतांना आपल्या नगरपंचायत कडून जाचक करांमुळे सामान्य नागरिकांचा आर्थीक बोजा वाढत आहे. आपल्या नगर पंचायत कार्यालयाकडून रहीवाश्यांना कोणत्याही मुलभूत सुविधा नसतांना कोणताही विकास झालेला नसून . पहील्यांदा नागरीकांना सुविधा देण्यात यावे. नगरपंचायत आंतर्गत कोणत्याच प्रकारचे शाळा, रोजगार हमीचे काम सुरु नसताना व गावात व रस्त्यावर कुठेही वृक्ष लागवड नसताना हे अतिरिक्त कर लावू नये, अन्यथा नाईलाजाणे लोकशाही मार्गाने जनआंदोलन करून काही परिणाम झाल्यास ढाणकी नगरपंचायत कार्यलय जबाबदार राहीलचा इशारा दिला.निवेदन देताना, बाळासाहेब चंद्रे, अमोल तुपेकर, बाबुराव नरवाडे, रमेश गायकवाड, रुपेश भंडारी गजानन मिटकरे, अक्षय रमेश भगत, शुभम मुनेश्वर, नामदेव गोपेवाड, साहेबराव वाघमोडे, सुधाकर बाबुळकर आणि ढाणकी नगरपंचायतचे नागरिक उपस्थित होते.

