निलेश कोकणे:-सातारा जिल्हा प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्यातील मलीकपेठ, बोपले, लांबोटी,या सीना नदी काठच्या गावात पाणी शिरून पुरस्थिती निर्माण झाली. काल या पूरग्रस्त भागास राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना . मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पूरग्रस्त नागरिकांशी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व प्रशासन आपल्याला सर्व प्रकारचे मदत करेल असे त्यांनी सांगितले. सीना नदीच्या पुलावर जाऊन पाण्याच्या पातळीची माहिती घेतली तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. व स्थानिक प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून सर्व पूरग्रस्तांना मदतीचे काटेकोर नियोजन करावे, अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी जनमेयराजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शंकर नाना वाघमारे, भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर,जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख , मोहोळ तालुका भा.ज.पा. मंडल अध्यक्ष रमेश माने, सतीश काळे हॉटेल जयशंकर चे मालक खताळ बंधू, गुरुराज तागडे, मलिकपेठचे सरपंच गणेश जगताप यांच्यासह आदि मान्यवर तसेच प्रशासनातील अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

