अकोला प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
शहरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवर बसवून एका ठिकाणी नेल्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीचा प्रयत्न करण्यात आला.
तक्रारदार आणि आरोपी दोघेही अल्पवयीन असून एकमेकांना परिचित आहेत. घटनेनंतर पीडितेने घरी जाऊन प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

