१९ ऑगस्ट २०२५ रोजी चोपडा तालुक्यातील उनपदेव गावातील बादल राजाराम बारेला या पाचवीतील विद्यार्थ्याला पास संपल्यामुळे बस मधून भर पावसात शिव्या देवून रस्त्यात खाली उतरवले. पावसात भिजत हा विद्यार्थी घरी पोहोचला. बस चा पास परवडत नाही म्हणून महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या हे नवीन नाही.
गरीब विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार दररोज घडतात आणि एकीकडे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या नातवला टेस्ला कार भेट देतात.
आपल्या नातवाचा हट्ट पूर्ण केलात त्याच्याच वयाचे महाराष्ट्रातील आम्ही लाखो विद्यार्थी आपणाकडे हट्ट करत आहोत.
आजोबा आम्हाला टेस्ला करा नको, शाळेत जायला एसटी पास मोफत करा.

या मोहिमे अंतर्गत आज मेहकर, डोनगाव आणि सुलतानपूर शहरातील विविध शाळा कॉलेज ला भेटी देऊन स्वाक्षरी मोहिमे विषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आज १००० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी करून झाल्या.
यावेळी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ओम तांगडे मेहकर तालुका अध्यक्ष पवन वायाळ प्रसिद्धी प्रमुख तुषार तांगडे आणि छात्रभारती चे कार्यकर्ते उपस्थित होते.


