गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
आष्टी जवळ च्या दुर्गापूर
गावकऱ्यांना वेळेत रेशन न मिळणे, तर कधी कधी महिन्याचे संपूर्ण रेशनच न मिळणे, तसेच उज्वला गॅसची 2-2 वर्षांपासून थकीत सबसिडी न मिळणे या गंभीर समस्यांवर आजाद समाज पार्टीने आज दुर्गापूरमध्ये धडक दिली.
नागरिकांच्या तक्रारीनंतर जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महिला अध्यक्ष सोनाशी लभाने व युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गावाला भेट देऊन समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यात आल्या.
🔹 यावेळी ग्रामपंचायतीत मंडळ अधिकारी अतकारे व फोन वरून राऊत मॅडम यांच्यासोबत चर्चा करताच रेशनचा तातडीने तात्पुरता तोडगा काढण्यात आला. हा प्रश्न प्रशासन संबंधित असल्याने वरिष्ठ लेवल ला मागणी करण्यात येईल.
🔹 गॅस सबसिडी प्रकरणात नागरिकांच्या चकरा सुरू असून, जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना सबसिडी न मिळाल्याने मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले.
🔹 या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चौकशीची मागणी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिले.
ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याची व नागरिकांचे फोन न उचलल्याची तक्रारही ग्रामस्थांनी यावेळी केली.
👉 गावातील नागरिक मोठ्या संख्येने या भेटीदरम्यान उपस्थित होते व त्यांनी आजाद समाज पार्टीच्या या पुढाकाराचे स्वागत केले.

