अकोला जिल्हा प्रतिनिधी: – इमरान खान सरफराज खान
बार्शिटाकळी: दिनांक 03/09/ 2025 रोजी बार्शीटाकळी येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये गीतांजली विद्यालय कान्हेरी सरप येथील 14 वर्षातील मुलांचा संघ व 17 वर्षातील मुलांचा संघ दोन्ही तालुकास्तरावर विजयी होऊन दोन्ही संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
विजयी संघाला गीतांजली विद्यालयाचे नवनियुक्त, उत्साही, तरुण, क्रीडाप्रेमी क्रीडा शिक्षक सुरज मडावी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विजयी संघातील सर्व खेळाडू क्रीडा शिक्षक मडावी सर त्यांचे सहकारी शाम भाऊ या सर्वांचे गीतांजली विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धे करता शुभेच्छा दिल्या…


