गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
अहेरी तालुक्यातील मौजा – कोरेपल्ली येथील अतिक्रमण शेतकऱ्यांचे वैयक्तीक वनहक्क दावांचे (अर्ज) हे उपविभागीय कार्यालय अहेरी येथे सादर करण्यात आले.
सदर वनहक्क दावांचे अर्ज हे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या तर्फे अर्ज भरण्यात आले आहे.
यामध्ये कोरेपल्ली गावातील ६१ अतिक्रमण शेतकऱ्यांनी आपला कुटुंबाचा उधार निर्वाह करण्यासाठी/ शेती करण्यासाठी म्हणुन सन – २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले आहेत. म्हणुन वन हक्क कायदा 2006 नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अंतर्गत वन हक्क समिती कोरेपल्ली कडून अतिक्रम शेतकऱ्यांचे वन हक्क दावांचे अर्ज हे कागदपात्रांसह उपविभागीय वन हक्क समिती तथा उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले.
यावेळी वन हक्क दावांचे अर्ज सादर करतांना – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव – बालाजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी तालुकाध्यक्ष – नागेश मडावी, कमलापुरचे माजी सरपंच – संबय्या करपेते, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते – तिरुपती मडावी, योगेश तलांडी, कोरेपल्लीचे वन हक्क समिती अध्यक्ष – रामा गावडे, सचिव – रैनु गावडे, दामा गावडे – पाटील, मंगेश कुळमेथे, बालाजी कुळमेथे, बिच्यु गावडे, मादी कुळमेथे, संभा गावडे, उंगा वेलादी, शंकर कुळमेथे, बंडू कुळमेथे, झूरु आत्राम सह कोरेपल्ली गावातील शेतकरी उपस्थित होते.

