मग तुम्हीच सांगा आम्ही जीवनात काय कमवतो अन काय गमवतोय…..
2019 च्या कोरोना महामारीत आम्हीच जगाच्या कामी आलोत….
कंत्राटी म्हण लोकांच्या तोंडी असता ही क्षणो- क्षणी,
स्थायी असणाऱ्यांच्या समरूप झालोत…
शासन ठरवणार आमचे स्थायीरुप ही मनोभावना
होती कायमची ..
आजचे रूप बघता सगळे आस्थाव्यस्त – बेधुंद ही रितच आहे जगाची……
कुणाला वर्ष 10 तर कुणी वयाच्याही हद्दपार झालीत …
न्यायासाठी भांडता- भांडता संपाचे 15 दिवस ही गेलीत….
प्रत्येक आरोग्य कंत्राटी वाटसरू जनतेचा असतांना…..
शासन का विसरले आम्हाला
बेघर करतांना…..
संप,आंदोलन,मोर्चे याची
महंती आपणांस काय कळणार ….
आमचे हक्क,अधिकार संविधानानेच आम्ही मिळवणार…..
——-व्यथा संपातील सहभागी संपूर्ण सदस्यांची——-


