गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली शहरातील गोकुलनगर, इंदिरानगर, विवेकानंद नगर,आशिर्वाद नगर, गणेशनगर येथिल युवकांनी MIM पक्षाच्या कामाला प्रेरित होऊन आज दिनांक 31 रोज रविवारला MiM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, अनिल संतोषवार, गोरक्षक दलाचे जिल्हा अध्यक्ष तौफिक सय्यद, महिला कार्याध्यक्षा शगुप्ता शेख, नसीमा शेख यांच्या नेतृत्वात
सिराज खान, मुश्ताक सय्यद, करणं मोहुर्ले, श्रुतिक बावणे, प्रीतम मेश्राम, अय्युब शेख, तेजस घोगरे,यश सरोदे, जावेद शेख, रेहान अन्सारी, साहिल सय्यद, अयान सय्यद, या युवकांनी MIM पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला.

MIM पक्षाचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्षाची विचारधारा हे प्रत्येक समाजाच्या दीन, दलीत, शोषित, पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणे आणि जातिवाद करणाऱ्या लोकांना धडा शिकवून माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म म्हणून काम करणे आणि वाईट मार्गावर जाणाऱ्या युवकांना चांगले मार्गदर्शन करून दारू, गांजा सारखे जीव घेणारे पदार्थ पासून वाचविण्यासाठी काम करणे आणि चांगल्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले.

