आजाद समाज पार्टी कडे तक्रार : पदाधिकाऱ्यांनी दिली तात्काळ भेट….
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
धानोरा तालुक्यातील मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सरांडा (बुज) हे गाव आजही रस्त्याविना अंधारात आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, पण गावाला जोडणारा पक्का रस्ता आजवर झाला नाही, यावरून नाराज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. कित्येकदा मागणी करून सरपंच व ग्रामसेवक या बाबीकडे दुर्लक्ष करत असून केवळ घर टॅक्स घेण्यासाठी ग्रामसेवक गावात येतात अशी तक्रार सुद्धा गावाकऱ्यांनी आजाद समाज पार्टी कडे केली.
ग्रामस्थांची व्यथा ऐकून आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, युवा तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे व मोसम मेश्राम यांनी प्रत्यक्ष 2 किलोमीटर चालत गावाला भेट देऊन समस्येची पाहणी केली.
🔥 स्वतःच्या पैशातून रस्ता! गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी पावसाळा सुरु होताच ग्रामस्थ स्वतः 1 ते 1.5 लाख रुपये गोळा करून तात्पुरता रस्ता बनवतात. आजवर 4 ते 5 लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करूनही प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई नाही.
📢 गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप 2017 मध्ये रस्ता पूर्ण झाल्याचे दाखवून ग्रामपंचायतीने बिल उचलले, पण प्रत्यक्षात गावात आजवर रस्त्याचे कामच झाले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड याची चौकशी लावणार असल्याचे म्हटले.
⚡ आजाद समाज पार्टीचा इशारा “निवडणुकीच्या वेळी मत मागण्यासाठी राजकीय पक्ष गावात येतात, पण आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधांकडे कोणी लक्ष देत नाही. प्रशासनाचे हे निष्क्रिय वर्तन असह्य आहे,” असा निषेध व्यक्त करत आसपा पदाधिकाऱ्यांनी तात्काळ गावात रस्ता मंजूर व काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
👉 आजाद समाज पार्टीचा इशारा — “आमच्या मुला-मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर, जगण्यावर रस्त्याअभावी परिणाम होत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर गावाकऱ्यांना सोबत घेऊन आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल ” असा इशारा दिला. गावातील ग्रामसभा अध्यक्ष राजेश हिचामी सहित अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.