शेतकरी मित्र पुरस्कारासाठी नावाची नोंदणी सुरू
अकोला – शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैल जोडी सजावट स्पर्धा ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केल्यानंतर आता अकोल्यातील शेतकरी यांच्यासाठी शेतकरी मित्र पुरस्काराचे नियोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक 30/ 8/ 2025 रोजी संत गाडगेबाबा व्यायाम शाळा शिवाजीनगर अकोला येथे एक महत्त्वपूर्ण बैठकीला राजीव गोतमारे, राजेश वानखडे, सुरेश भिरड, गोपाल मांडेकर, राजू खान ,पिंटू थोंटांगे अनिल मालगे आदी मान्यवर उपस्थित होते या बैठक मध्ये शेतकरी मित्र पुरस्काराचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये शेतकरी मित्र पुरस्कार ची घोषणा करण्यात आली हा पुरस्कार अकोला महानगरातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाची पाहणी करून उत्कृष्ट पीक, शेतीचे केलेली देखरेख, याची निरीक्षकांच्या देखरेखी मध्ये पाहणी करून शेतकरी मित्र पुरस्काराचे मानकरी ठरणार आहेत ,उत्कृष्ट शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला शेतकरी मित्र पुरस्कार दिल्या जाणार आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीत केलेल्या पिकाची शेतकरी मित्र पुरस्कारासाठी निवड करून घ्यायचे असेल त्यांनी अनिल मालगे मोबाईल नंबर.8625021422, राजेंद्र किसनराव गोतमारे -9422160626, सुरेश मनोहर जी भिरड-9657533362, राजेश वानखडे -9657357455
यांच्या मोबाईल नंबर वर आपले नाव पत्ता मोबाईल नंबर पाठवावा
आम्ही नेमलेल्या निरीक्षकांमार्फत आपल्या शेतीची पाहणी करू तरी अकोला महानगरातील शेतकऱ्यांनी शेतकरी मित्र पुरस्कारा साठी
आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था पोळा चौक,जुने शहर अकोला चे अध्यक्ष अनिल मालगे यांनी केले आहे.



