विदर्भ विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
हिंगणघाट – विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस सर्व संवेदना विसरून बसला मी माझे कुटुंब,माझे घर यातच गुंतून गेला अशातच मानवी जिवण जगताना त्याला एकट्याला समस्या अडचणी, चिंता याला समोर जावे लागते अशा वेळी तो मध्यस्थाची मदत घेवून शाॅर्टकट मार्ग शोधतो यावेळी तो अविवेकी वागत आहे हे त्याच्या ध्यानीमनी पण येत नाही कारण त्याच माणूस म्हणून विवेकी व्यक्तीमत्व घडलेल नसत त्यामुळे तो भावणीक,श्रध्दाळू होवून वागतो आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात प्रज्ञा,शिल,करूणाच माणसाचं विवेकी व्यक्तीमत्व घडवू शकते असे स्पष्ट मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार,वर्धा यांनी बुध्द उपासक व उपासिका यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले
कल्पतरू बुद्ध विहार हिंगणघाट येथील सभागृहात प्रा रवि कांबळे यांनी लेखन केलेले धम्मदर्शन ग्रन्थाचे वाटप हिंगणघाट येथील बुध्द विहार समितीला मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता .
यावेळी मंचावर माजी आरोग्य अधिकारी डॉ गोवर्धनजी दुधे, धम्मदर्शन ग्रन्थाचे लेखक प्रा रवि कांबळे, चंद्रपूर,माजी नगरसेविका मा लता थुल, सामाजिक कार्यकर्ते मा राजेश धोटे हिंगणघाट शाखेचे प्रधान सचिव मा सुनील कानकाटे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रज्ञा शिल करूणा या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सुरकार मार्गदर्शन करताना म्हणाले 2000 वर्षांपूर्वी बुध्दाने जगाला कार्यकारणभाव सांगितला कि मानवी जिवनात, जगात,पृथ्वीतलावर, पर्यावरणात जी जी घटना घटते त्यामागे कारण असते ते प्रत्येकाच्या बुध्दीला समजू शकते तो त्याच्या कुवतीप्रमाणे ते कारण बदलविण्यासाठी प्रयत्न करूण बदलवू शकतो
सर्वच कारण समजले नाही तरी कालांतराने ते समजू शकते त्याचा सोपा अर्थ हा जेवढा पुरावा तेवढा विश्वास हे पुरावे शोधण्यासाठी निरीक्षण तर्क अनुमान प्रयोग प्रचिती या मार्गाने जावे लागते हेच भारतीय संविधानातील भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आहे यालाच प्रज्ञा म्हणजे विवेक होय विवेकी माणूस हा नेहमी विवेकाने विचार करून कृती करतो तो भावनेच्या, श्रद्धेच्या आहारी जाऊन वागत नाही. शिल म्हणजे नितीने वागणे विवेकी व नितीमत्ता जोपासणारा माणूस हा कधीही कोणाला फसवित नाही तो करुणा ठेवतो त्यामुळे तो कधीही हिंसक ,दुराग्रही ,भ्रष्टाचारी, दुस-याचे कधीही अहित होईल, अपमान होईल,दुस-याचे मन दुखेल,अशी कृती करीत नाही
त्यामुळे प्रज्ञा, शिल, करूणा असणारा समाज निर्माण होवून सर्व समस्यांचे निराकरण होवू शकते विवेकी ,नितीमान समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रज्ञा, शिल ,करूणा अंगिकारावी ,तसे वागावे असे आवाहनही केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गोवर्धनजी दुधे यांनी केले यावेळी प्रा रवि कांबळे यांनी धम्मदर्शन या ग्रन्थाच्या निर्मितीची माहिती दिली सूत्रसंचालन विजय झाडे आभारप्रदर्शन वनिता कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले.



