इ.स.१९२० मध्ये कुरझडी (जा.) येथील शिक्षक (गुरुजी)हे गावातील मुलांना स्वर्गीय धनुजी बोकडे (अण्णाजी )पाटील यांच्या वाड्यात शिक्षण देत होते.त्याच काळात यांनी गणपती उत्सव आपणही आपल्या ह्या शाळेत साजरा करावा म्हणून त्यांनी मातीला आकार देऊन गणपती मूर्ती बनवून प्राण प्रतिष्टा केली.
हा काळ १९२० चा असून, स्वर्गीय विठ्ठल राव गरड .यांचा मुलगा साहेबरावजी गरड हे आज रोजी ८६ वर्षाचे आहे.त्यांच्या कडून ही माहिती युवां ग्रामीण पत्रकार संघ संपर्क प्रमुख आशिष जाचक यांनी मिळवली .
पहिल्या वर्षी गणेश उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला असून ,धनुजी बोकडे पाटील यांनी सर्व परीने पूर्ण सहकार्य विठ्ठल राव गरड यांना केले.इथूनच कुर्झंडी जा येथे गणेश उत्सवा ची सुरुवात झाली. सुरवातीला काही काळ सर्व खर्च हे पाटील करत होते.
हळू हळू गाव वर्गणीस सुरवात झाली. दिवसे न,दिवस गाव कऱ्यांचा उत्साहा वाढत गेला. आणी मातीच्या गणपतीपासून मूर्तीत रूपांतर झाले. नंन्तर मूर्ती ही शहराच्या ठिकाणावून यायला लागली ,पुरण पोळी, लाडू असा त्याही काळात महाप्रसाद व्हायचा कालंतराणे गणपती उत्सवा साठी युवा मंडळे तयार होऊ लागली.त्यातच एक बाल गणेश मंडळं झालं त्यांनी तब्बल २० वर्ष गणेस उत्सव साजरा करून, पुलिस प्रशासना कडून उत्कृष्ट मंडळ म्हणून नामांकन सुद्धा मिळवलं.
आजही ह्या सार्वजनिक उत्सवाला कोणत्याही प्रकारच गाल बोट न लागता .आजही ही परमपरा मोठ्या थाटात ,आणी आंनदात पार पाडते.आज कुरझडी जा. येथील गणेश उत्सवास १०४ वर्ष पूर्ण झाले. असून दि. २७/ ८/२०२५ रोजी गणपती मूर्ती स्थापना करण्यात आली. असून सर्व ग्रामस्थान च्या उपस्थितीत विधीनुसार प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गावात गणपती मंदिर ,असून,सुवर्णं मोहत्सव वर्षी अखंड गणेश मूर्ती स्थापित केली आहे. त्याच मंदिरात हे गणेश उत्सव मूर्ती स्थापित केल्या जाते.हे मूर्ती आजही धनुजी पाटील नंन्तर श्री सुभाष राव बोकडे पाटील मूर्ती स्थापना करून
आजही “एक गाव एक गणपती”
ही परंपरा जोपासत आहे.गणपती पूजन प्राण प्रतिष्ठा बाल गणेश मंडळं चे प्रमुख श्री महेंद्र तळवेकर, यांच्या हस्ते करण्यात आली. तर ह्या प्रसंगी उपस्थित साहेबरावजी गरड,सुभाष राव भालकर,अशोकराव पांडे,रवींद्र भिडकर,हरिभाऊ दुर्गे, देविदासजी चर्डे,भाऊरावजी चौधरी,महादेव राव तळवेकर, नारायणरावं बोरकर,लक्ष्मनराव पांडे,आशिष जाचक,अतुल भोस्कर,व समस्थ शिवभक्त मित्र परिवार यांच्या उपस्थितीत प्राण प्रतिष्ठा व पूजन करण्यात आले.




