अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर.
अकोला (ता. १८) : शहराच्या मधून वाहणाऱ्या
मोरणा नदीला पूर आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सेतू पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. पुलावर कठडे लावून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने मनपा कर्मचारी व आरोग्य विभागाचे पथक राजेश सरप उपायुक्त पूर्व झोन शैलेश पवार मुख्य स्वच्छता निरीक्षक सुरेश पुंड स्वच्छता निरीक्षक सतत लक्ष ठेवून आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग बंद करण्यात आला असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महत्वाची सूचना : सेतू पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असून परिस्थिती नियंत्रणात आल्यावरच तो खुला करण्यात येईल.

