” पालकमंत्री व शासनाचा रिपाइं (आंबेडकर) तर्फे तीव्र निषेध ” !
: – महेंद्र मुनेश्वर
वर्धा: विदर्भ विभाग युसुफ पठाण
विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून राज्याची आर्थिक कुचंबणा सुरू आहे.लाडक्या बहिणींना महिना १५०० रुपये देण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा (जलजिवन मिशन) व स्वच्छता ,सार्वजनिक बांधकाम ,सामाजिक न्याय व आदिवासी विभागाच्या हजारो कोटींच्या निधीवर एकीकडे डल्ला मारला जात आहे.दुसरीकडे तिजोरीत खडखडाट असल्याने पायाभूत सुविधा विकासकामांची कोटी रुपयांची बिले थकल्याने वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.यातूनच सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदारांची बांधकामाची थकीत देयक रक्कम थकल्याने वर्धा शहरातील बाबा जाकीर या शासकीय कंत्राटदाराने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक बांधकाम कर्यालयापुढे अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.पोलिस व सामाजिक कार्यकर्ते यांच्या दक्षतेमुळे कंत्राटदाराचे प्राण वाचले.जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. विश्वकर्मा योजणेचा निधी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत उपलब्ध असतांनाही कंत्राटदाराच्या कामाची थकलेली देयक रक्कम द्यायला प्रशासन तयार नाही,हे निंदनीय आहे.करिता राज्य सरकार व स्थानिक पालकमंत्री तसेच प्रशासनाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

स्थानिक जिल्हाधिकारी प्रशासन व पालकमंत्री यांच्या हेतुपुरस्सर निर्देश व आदेशा नुसार शासकीय कंत्राटदाराला त्याने केलेल्या बांधकामाची थकीत देयक रक्कम देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता टाळत असतील तर दोषीवर शासना अंतर्गत उच्च स्तरीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुध्दा रिपाइं (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री व संबधित अभियंता वर्ग तसेच अधिकाऱ्यांची हुजरेगिरी कोणत्याही कंत्राटदाराने किवा त्यांच्या संघटनेनी करु नये.यासाठी सर्व कंत्राटदारांनी एकत्रित येणे गरजेचे आहे,अभियंता वर्ग,अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सोबत कमिशननितीचा आपर करु नये असेही मुनेश्वर म्हणाले.
गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या शासकीय बांधकामाची थकित देयक रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मिळत नाही म्हणून त्या त्रस्त शासकीय कंत्राटदारालाच त्याच्या कौटुंबिक उपासमारीमुळे आत्मदहन करण्याची वेळ येणे ही महाराष्ट्र राज्यात गंभीर व लाजिरवाणी घटना आहे.त्यामुळे आम्ही रिपाइं (आंबेडकर) च्या वतीने,जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी प्रशासन,राज्यसरकार व सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीरपणे तीव्र निषेध करीत आहोत.
‘ शासकीय कंत्राटदार बाबा जकिर यांनी वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागात शासकीय कंत्राटीची कामे केली,पण त्यांना कामाचे देयक थकबाकीचे बिल मिळाले नाहीत ‘, त्यामुळे कंत्राटदार जकीर यांचेवर हालाकीची परिस्थिती आली.ते कर्जबाजारी झाले.त्यांना स्थानिक प्रशासनाने सूडबुद्धीने कमिशनसाठी भयंकर त्रस्त केले.
त्यामुळे बाबा जाकीर या शासकीय कंत्राटदाराने स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.याला सर्वश्री जबाबदार राज्य सरकार,स्थानिक पालकमंत्री,जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी वर्ग आहे,असा आरोप सुध्दा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन केला आहे.



