मराठवाडा विभाग प्रमुख :- शुभम उत्तरवार
शहरातील जुना लोहा प्रभाग क्रमांक ८ मध्ये माजी नगरसेवक करीमभाई शेख यांच्या वतीने रक्षा बंधन कार्यक्रमा अंतर्गत लाडक्या बहिणींना जवळपास दीड हजार साड्या व फराळाचे वाटप करण्यात आले.
जुना लोहा शहरातील प्रभाग क्रमांक ८ जुना लोहा येथील श्री गोरोबा काका मंदिराच्या प्रांगणात त्या प्रभागाचे माजी नगरसेवक करीमभाई शेख यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर दि.(१२) ऑगस्ट रोजी रक्षाबंधनांचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेविका सौ.शोभाताई बगडे तर प्रमुख उपस्थिती कार्यक्रमांचे आयोजक तथा या प्रभागाचे मा.नगरसेवक करीम भाई शेख, सामाजिक कार्यकर्त्या सविता सातेगावे उपस्थित होत्या.
यावेळी प्रभागातील महिला भगिनींनी मा. नगरसेवक करीम भाई शेख यांना राख्या बांधल्या.

लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी सदैव तयार — मा.नगरसेवक करीम भाई शेख
यावेळी बोलताना मा.नगरसेवक करीम भाई शेख म्हणाले की लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर आहे. आमचे नेते आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्या माध्यमातून गोरोबाकाका मंदिराच्या सभागृहाला निधी मिळणार आहे. सदरील कार्यक्रमाला माजी नगरसेविका शोभाताई बगडे आल्या आहेत.त्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात मला मार्गदर्शन करतात.प्रणिताताई ही येणार होत्या त्या कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे येऊ शकल्या नाहीत .
आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे असे मा.नगरसेवक करीम भाई शेख म्हणाले.
चौकट
तसेच यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षा सौ.शोभाताई बगडे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महायुती सरकार चांगले विकासाचे काम करीत आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत.
करीम भाई शेख हे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवितात ते आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून सर्व विकास कामे व विविध योजना राबवितात तुम्ही लाडक्या बहिणी करीम भाई शेख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाव्या केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस सरकार आहे.
करीम भाई शेख हे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून तर प्रतापराव पाटील चिखलीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कामे करुन घेतात तुम्ही करीम भाई यांच्या माध्यमातून कामे करुन घ्या त्यांच्या पाठीशी उभे रहा असे शोभाताई बगडे म्हणाल्या.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार शिवराज दाढेल यांनी केले.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सलीम शेख,गौस पटेल, शेख अजमद, पद्माकर केंद्रे,बळी नागरगोजे,माधव ससाणे,संजय कदम, सोहेल शेख आदींनी परिश्रम घेतले.

