प्रतिनिधी:- सगीर शेख
जागतिक आदिवासी दिनानिमित्त खर्डी परिसरातील विविध आदिवासी संघटनांनी खर्डी गाव ते खर्डीस्थानक परिसरा पर्यंत पारंपरिक वेशभूषा करून रॅलीचे आयोजन केले होते.
तसेच गुणवतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. खर्डीतील जिप शाळा-सोनाई-सीताई मंदिरातून रॅलीला सुरवात करण्यात आली,या रॅलीत आदिवासी संस्कृतीचा वारसा जपत आदिवासी बांधवानी तारपा नृत्य व विविध नाच गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली ह्या रॅली चा समारोप स्टेशन परिसरातील संतकृपा लॉन्स येथे करण्यात आला.
यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा,खर्डीच्या सरपंच मंगला गावीत, माजी जिप अध्यक्षा मंजुषा जाधव,आदिवासी संघर्ष समितीचे चंद्रकांत जाधव,श्रेयश वेखंडे, अशोक वीर मनसेचे खर्डी शहराध्यक्ष सगीर शेख गणेश कोर,सचिन निचिते,विठ्ठल भगत,प्रशांत खर्डीकर, भाग्यश्री डिगे,भाऊ मराडे, सीमा डिगे,अनिल मडके ,रतन चोथें,रामू डोके,नंदू चौधरी,रवी डिगे,दीपेश वाघचौडे, ,,यतीन दांडगे,निखिल बेडकुळे तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पानगा यांनी केले.

