रमीबाज मंत्री माणिकराव कोकाटे यांना बरखास्त करा.
डॉ.गोपाल बच्छिरे
लोणार प्रतिनिधी:- सुनील वर्मा
शेतकऱ्यांच्या समस्यांना तिलांजली देणारे रमीबाज मंत्री माणिकराव कोकाटे यांना बरखास्त करा. अशी मागणी शिवसेना उ.बा.ठा. जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना केली.
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, विजबिल माफ करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे दिवास्वप्न दाखवून शेतकऱ्यांना दिलेले अभिवचन शेवटी जुमला ठरविले. शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे. कुठे गारपीट, कुठे अतिवृष्टी, कुठे ढगफुटी यामुळे शेतकरी बरबाद झाला आहे व तो आत्महत्या करत आहे.
व निवडून दिलेले मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीलांजली देऊन संसदेत कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्याचा जुगार, रमी खेळतात. अश्या शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्री केले. हे तर एक मंत्रीपद काढून दुसरे मंत्रीपद देणे मी शिक्षा आहे का बहुमान, म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्री पदावरून बरखास्त करा नसता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत देण्यात आला
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे यांच्या सह शहर प्रमुख गजानन जाधव सर, तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती जायभाये, शालिनीताई मोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर, प्रकाशभाऊ सानप, उपसरपंच रवींद्र सुटे, युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर, विभाग प्रमुख गोपाल मापारी, तानाजी अंभोरे, अमोल सुटे, विजय घोडके, मंगेश मोरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, अल्पसंख्यांक चे अशपाक खान, फहीम खान, उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

