प्रतिनीधी:
(सतिश वि.पाटील)
महाराष्ट्रातील कल्याण च्या वैष्णवी पाटील ने काल वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी झालेल्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत आंतिम फेरीत हरियाणाच्या महिला पैलवान वर अप्रतिम विजय मिळवला .
महाराष्ट्रासाठी हरियाणा कायमच अव्हान राहिले आहे अशातच वैष्णवी ने मिळवलेला विजय महाराष्ट्रातील महिला कुस्तीगीरांसाठी उमेदीचा ठरेल असा आहे.
झाग्रेब येथे १३ ते २१ सप्टेंबर रोजी या स्पर्धा होणाऱ्या या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी ६५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल ,कल्याणची वैष्णवी पाटील जय बजरंग तालीम येथे पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

लहानपणा पासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये पोचली आहे.वैष्णवी पाटीलचे वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचेही घरामधून पहिल्यापासूनच कुस्तीचा ओढा होता.त्यामुळे वैष्णवीला आवड निर्माण झाली.राष्ट्रीय लेव्हल पर्यंत तसंच आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत त्यांनी बाळगलेला स्वप्न मला पूर्ण करायचा असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक पर्यंत मजल मारायची आहे, असे वैष्णवीने सांगितले.
वैष्णवी पाटील हिने आपल्या देशाचे,गावाचे,आईवडीलांचे,समाजाचे नाव उज्ज्वल करावे. पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन.

