बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
शिवसेनेने अनोख्या पद्धतीने नोंदविला निषेध
लोणार:-
अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर आलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या गळ्याात १० प्रश्नांची माळ घालून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अनोख्या पद्धतीने १ ऑगस्ट २०२५ रोजी निषेध नोंदवला.
विश्रामगृह लोणार येथे पालकमंत्र्यांचे स्वागत करताना शिवसेना जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या १० प्रश्नांचे लेबल लावलेला पुष्पहार त्यांच्या गळ्या घालून प्रश्न विचारले. यावेळी पालकमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले. डॉ
बछीरे यांनी उपस्थित केलेले १० ठळक प्रश्नांमध्ये पश्चिम महाराष्ट्रासारखे विदर्भात सुद्धा सरसकट नुकसानभरपाईचे अग्रीम अनुदान कधी?, गेल्या २ वर्षांच्या गारपीट नुकसानभरपाईचे काय झाले?, २ वर्षांतील अतिवृष्टीच्या मदतीचा निर्णय कधी होणार?, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी होणार?, ३ वर्षांपासून रखडलेला पीक विमा कधी मिळणार?, शेतकऱ्यांना पीक कर्जातून कधी मुक्तता मिळणार?, वीज बिल माफी कधी जाहीर होणार?, सन २०२५ मधील अतिवृष्टीचे नुकसानभरपाईचे नियोजन कधी?, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना कधी दिलासा देणार?, जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार थांबवून ‘घर घर नळ मे जल’ कधी?, या प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी, सर्व प्रश्नांवर येणाऱ्या काळात योग्य कार्यवाही करून प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा उपप्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुकाप्रमुख राजू बुधवत, शहरप्रमुख गजानन जाधव, महिला संघटिका तारामती जायभाये, संजीवनी वाघ, लूकमान कुरेशी, श्रीकांत मदनकर, तानाजी मापारी, सुदन अंभोरे, कैलास अंभोरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, अशपाक खान, फहीम खान, रामभाऊ मोरे, आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

