[ अण्णाभाऊ साठे सभागृह व अडीच कोटीच्या विकास निधीची घोषणा ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचीत समाजाची व्यथा, वेदना जगासमोर आणली.कष्टकरी समाजाला आत्मभान दिले.साहित्य व चळवळीच्या माध्यमातून त्यांनी उभारलेला लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.लोकशाहीर, साहित्यरत्न, समाजसुधारक, लेखक, कवी असे कितीतरी आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वात व कार्यात प्रतिबिंबित होतात. साहित्याचा केंद्रबिंदू कष्टकरी, कामगार मानून त्यांनी लेखन केले हे त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री ना. अशोक उईके यांनी केले. राळेगाव प्रभाग क्र. 5 येथे आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चौहान यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती राळेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी भव्य मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या जयंती कार्यक्रम निमित्ताने शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गविअ केशव पवार,माजी प. स. सभापती प्रशांत तायडे, शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा प्रभागाचे नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ,संपादक तथा नगरसेवक मंगेश राऊत,माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, महेश सोनेकर,संतोषभाऊ कोकुलवार,संदीप पेंदोर,कुंदन कांबळे,गोपाल मशरू,ठाणेदार शीतल मालटे, मुख्याधिकारी गिरीश पारेकर, किशोर जुनूनकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भाष्य करतांना ऍड. प्रफुल चौहान यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकणारे भाष्य केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेल्याचे चित्र होते.
पुढे बोलतांना ना. अशोक उईके यांनी केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनाची माहिती दिली.दलित, वंचीत समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी कार्य करीत असल्याची ग्वाही दिली. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत विकासाची गंगोत्री पोहचवण्याला प्राधान्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.राळेगाव येथील प्रभाग क्र. 5 मध्ये भव्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागुहाला निधी देऊ, विविध विकासकामा साठी कधीच निधीची कमतरता येऊ देणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अण्णाभाऊ साठे यांचे सर्वच लेखन उत्कृष्ट आहे 'फकीरा ' ही कादंबरी म्हणजे इतिहास आहे. असे गौर्वोदगार त्यांनी काढले. या वेळी प्रभागात 1 कोटी 25 लाखाची विकासकामे दिल्याबाबत ना. अशोक उईके यांचा तर भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुती बाबत ऍड. प्रफुल चौहान यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. जयंती उत्सव समिती चे आशिष आमटे, कार्तिक खडसे, राजन शेंडे, अंकित बावणे, अमर कांबळे,
इंदूबाई खंडाळ, दिक्षा नगराळे, गजू शेंडे, गनराज पायघन, गणेश बोन्डे, सुमित वाघाडे, नाना आव्हाड, देवा खंडाळकर, मनोज पायघन, गजानन खडसे, आकाश खडसे, विनायक खडसे, विनोद आमटे, राकेश आमटे, आंचलं इंगळे, रमेश वानखडे रोशन पायघन, पवन खडसे व जयंती उत्सव समितीच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला राळेगाव व परिसरातील प्रभाग क्र. 5 येथील महिला-पुरुष युवक – युवती यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी तर संचलन मनिष काळे यांनी केले.
‘प्रभाग क्र. 5 मध्ये आज पर्यंतचा सर्वाधिक विकासनिधी नामदार अशोकजी उईके सर यांनी दिला. अण्णाभाऊ साठे सभागृह व मुख्य रस्त्याकरीता पुन्हा अडीच कोटी च्या निधीची घोषणा करून त्यांनी जी विकासात्मक दृष्टी दाखवली त्याला तोड नाही. सरांच्या दातृत्वाने इथला कष्टकरी समाज आज भारावून गेला आहे. शेवट पर्यंत सरांच्या सोबत राहू त्यांनी आपला आशीर्वाद आणि पाठिंबा असाच कायम ठेवावा अशी प्रार्थना करतो.’
-शशिकांत उर्फ बाळू धुमाळ
(नगरसेवक प्रभाग क्र. 5 )

