विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
पोलीस स्टेशन ला फिर्यादी नामे शेख एजाज शेख गफार वय 40 वर्ष प्रा श्रीराम लेआउट बोरगाव मेघे यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर ला अप No. 1099/2025 कलम 305,331 (4) BNS चा गुन्हा नोंद असून कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांचे दुकानाचे शटर फोडून ट्रकचे दोन हेड, तीन क्लाच प्रेशर तीन नग, एक टाइमिंग प्लेट, गिअर बॉक्स मधील सामान, एक एचपी कंपनीची मोटर, गाड्या धुण्याची दोन मोटर असा जु कीं 54,000 रुपये चा माल चोरून नेला आहे यावरून पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, पोलीस स्टेशन वर्धा शहर, असे अज्ञात आरोपी व चोरी गेलेल्या मालाचा शोध घेणे करता पोलीस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खास मुखबीर कडून माहिती मिळाली की, एक प्रवासी ऑटो हा राधानगरी शांतीनगर परिसरात संशयास्पद स्थितीत हायवे बाजूला एका लेआउट मध्ये उभा आहे सदर घटनेची शहानिशा करणे करता दोन पंचांसह वरील ठिकाणी पोहोचून शहानिशा केली असता
सदर प्रवासी काळा रंगाच्या ऑटोत वरील वर्णनाचा माल यातील महिला आरोपी No. 1. श्रीमती लक्ष्मी रमेश देऊळकर 2. सौ भारती हिरा इटकर 3. मनीषा शंकर सातपुते व दोन विधी संघर्षित बालिका सर्व राहणार गिट्टी खदान बोरगाव मेघे व ऑटो चालक आकाश गोकुळ खत्री राहणार इतवारा बाजार वर्धा यांच्या जवळून चोरी गेलेला म** कीं 51,000 रुपये व चोरीचे गुण्यात वापरलेला ऑटो No. MH 49 AR 1891 कीं 1,30,000 रुपये असा जुमला किंमत 1,81,000 रुपये मल जप्त करण्यात आला सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक पराग पोटे ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर, पोलीस निरीक्षक संतोष ताले यांचे मार्गदर्शनात गुणे प्रगटीकरण पथकाचे पोउनि शरद गायकवाड सर, गुन्हे प्रगटीकरणपथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस हवालदार नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, चालक पोउनि शशिकांत मुंडे सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे

