अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला:- शहरातील रहिवासी व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मंगेश ऊर्फ दादा तोताराव सावरकर (रा. नागपूर) असे आरोपीचे नाव असून, त्यास नागपूर येथून अटक करण्यात आली होती. रामप्रकाश मिश्रा (५५, रा. माधवनगर, गौरक्षण रोड) यांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर त्यांच्याच कार्यालयासमोर अज्ञात दोन आरोपींनी मोटारसायकलवरून येत धारदार चाकूने हल्ला केला होता.


