भाविक भक्तांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या-ठाणेदार भाऊराव घुगे (मेहकर), ठाणेदार गजानन करेवार (सा.खेर्डा)
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनिल वर्मा :-
परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या 89 व्या जन्मोत्सव सोहळा वरुडी तालुका सिंदखेड राजा येथे दरवर्षीप्रमाणे दोन डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत साजरा केला जात आहे. दिनांक 9 डिसेंबर रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार असल्यामुळे या सोहळ्यास सत्तर ते ऐंशी हजार हून अधिक भाविक भक्त येण्याची शक्यता असल्यामुळे साखरखेर्डावरून वरुडी मेहकर कडे जाणारी येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने प्रशासनाकडून वळविण्यात आली आहे.
माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या 89 व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी साखरखेर्डावरून वरुडी मार्गे मेहकर कडे जाणारी येणारी वाहतूक दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. सध्याचा मार्ग हा साखरखेर्डा-वरुडी-देऊळगाव माळी-मेहकर असा आहे परंतु नऊ तारखेला हा मार्ग सकाळी सहा वाजता पासून बंद होणार असून साखरखेर्डा-गोरेगाव-वडगाव माळी-सायगाव मार्गे मेहकर किंवा चिखली- साखरखेर्डा-लव्हाळा मार्गे मेहकर असा पर्यायी मार्गाने वळवण्यात आला आहे. जर सदरील आदेशाची उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाबुरावजी घुगे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की, यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.
बाबुरावजी घुगे
ठाणेदार मेहकर पोलीस स्टेशन
यात्रेच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविक भक्तांची मांदियाळी खूप मोठ्या प्रमाणात राहणार असल्यामुळे महिला आपले लहान बाळ, तसेच अंगावरील दागिने, व चोरट्यापासून सावध राहा. जर कुठे काही अनुचित प्रकार घडला तर ताबडतोब उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याची माहिती द्या.
गजानन करेवार
ठाणेदार साखरखेर्डा पोलीस स्टेशन.


