कंधार प्रतिनिधी-ज्ञानेश्वर कागणे
घोडज ते मजरेसांगवी जाणारा रस्ता या रस्त्यावरून जांभुळवाडी ,आनंदवाडी, बोरी खुर्द, मजरा ,दगडसांगवी, कदमाचीवाडी ,चोंडी या गावातील लोक ये जा करतात गेली एक वर्षापासून घोडज ते बोरीपर्यंत या रस्त्याचे काम चालू असून गुत्तेदारा आणि प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे पेशंटची सुद्धा घेऊन जाने कठीण झाले आहे बोरी खुर्द येथील या रोडच्या अवस्थेमुळे दोन ते तीन पेशंट अटॅक आजाराने मरण पावली त्याबरोबरच या गावातील मोठ्या संख्येने देशसेवा करण्यासाठी जवान आपली सेवा सीमेवर बजावत आहेत परंतु केवळ दहा ते पंधरा दिवसांसाठी ते रजेवर आले असता त्यांना या गावातून ये जा करण्यासाठी किंवा आई आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी या गावाकडे पाठ फिरवावी लागत आहे गतवर्षी या रस्त्याच्या अवस्थेमुळे एका जवानाच्या पत्नीची प्रस्तुती ॲम्बुलन्स मध्येच झाली
अशी अवस्था या गावाना ये जा करणाऱ्या लोकांची होत आहे लोकप्रतिनिधी केवळ मत मागण्यासाठी येतात निवडणुका झाल्या की या गावाकडे पाठ फिरवतात अशी या गावातील लोकांकडून प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे सध्या परिस्थिती घोडज ते बोरीपर्यंत लोकांना पाऊस आल्यानंतर चालत जावे लागत आहे
प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सूर या गावातील लोकांमधून निघत आहे.

