महाक्रांती न्यूज नेटवर्क: –
बीड जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन निर्भय महाराष्ट्र पार्टी विचारणार आहे.
S.P. साहेब आपल्या बीड जिल्ह्यातील किती पोलीस स्टेशन मध्ये लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.ज्याला ज्याला आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.असे वाटते आहे आणि त्यांच्याकडे त्या संदर्भात पुरावे आहेत.अशा लोकांनी बीड S.P. ऑफिसात येऊन आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडावे. आणि याबाबतीत ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत .ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संगणमताने आणि काही लोकांना हाताखाली धरून अन्याय केलेला आहे.खोट्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत. अशा पोलीस कर्मचाऱ्यावर चौकशी लावावी व त्यांनी असे गुन्हे का दाखल केले.
या संदर्भात माहिती विचारू त्यांना शासकीय कामात कसूर व आपल्या पदाचा गैरवापर, जनतेची केलेली पिळवणूक, व त्यांची समाजात झालेली मानहानी, व त्यांची आर्थिक झालेलं नुकसान भरपाई हा सर्व खर्च शासनाने ज्या ज्या पोलीस वाल्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.असे निष्पन्न झाल्यास त्या त्या पोलीस कर्मचाऱ्याकडून या सर्व व्यक्तींना आर्थिक स्वरूपाचे झालेले सर्व नुकसान भरपाई व मानहानी हे तात्काळ स्वरूपात देण्यात यावे.अशी मागणी निर्भय महाराष्ट्र पार्टी करत आहे.जनताच मालक हे प्रशासनाला समजायला हवे…! जनतेची छळवणूक, पिळवणूक आपल्या पदाचा गैरवापर आणि आपल्याला मिळाल्या पदाचा दुरुपयोग करून जनतेची सर्रास लूट आर्थिक प्रकारे केली जात आहे. त्यांना गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीचे होण्यासाठी प्रोत्साहित करणारे पोलीस कर्मचारी हे गुन्हेगारा पेक्षाही मोठे गुन्हेगार आहेत.
असं स्पष्ट मत निर्भय महाराष्ट्र पार्टी मांडत आहे.
आमच्या मागण्या
1 )
आपल्या बीड जिल्ह्यामधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ज्यांना ज्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले आहे.
असे वाटत आहे. आणि ज्यांच्याकडे या संदर्भात पुरावे आहेत.
अशा लोकांचे अर्ज पोलीस अधीक्षक साहेब म्हणजे बीड [ S.P.] आपण हे खोट्या गुन्ह्यामध्ये फसवले बाबत.
अर्ज तात्काळ स्वरूपात स्वीकारावे.
2)
बीड जिल्ह्यातील जनतेला आपण सूचित आव्हान करावे.
मीडियाद्वारे व सोशल मीडियाचा वापर करून बीड जिल्ह्यातील पीडितांना आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत लेखी स्वरूपात तक्रार नोंद करण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक कार्यालय सज्ज आहे.
आणि
S.P. ऑफिस बीड या ठिकाणी पिडितांवर झालेल्या तक्रारी नोंद करून घ्याव्यात.
3)
पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत. भक्षक नाहीत. असे मीडियाद्वारे आव्हान करावे.
4)
ज्यांनी ज्यांनी खोट्या गुन्ह्याबाबत अर्ज केलेले असतील. अशा अर्जावर पोलीस अधीक्षक साहेबांनी लवकरात लवकर चौकशी करून कारवाईस पात्र करावे.
आणि
पिडित व्यक्तींना योग्य न्याय द्यावा.
5)
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पिडित व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.
असे निष्पन्न झाल्यास पोलीस कर्मचाऱ्यावर पदाचा गैरवापर.
जनतेची छळवणूक ,
पिळवणूक ,
आणि अपमानास्पद वागणूक त्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आणने,
समाजात त्यांची नाहक बदनामी केरणे
आणि आपल्या कामात कसूर तसेच शासनाची फसवणूक.
शासकीय कामात संगनमताने लोकांवर खोटी कारवाई करण्यास जबाबदार.
या संविधानीक कलमा अंतर्गत कार्यवाही करावी.
असे निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणत आहे .
जेणेकरून समाजात पोलिसांविषयी जो रोष आहे. तो कमी होईल. समाजात पोलीस हे समाजाचे रक्षक आहेत.
हे दाखवून देण्याची जबाबदारी माननीय पोलीस अधीक्षक साहेब ही आपली असणार आहे.
जर आपण या प्रकरणाकडे लक्ष न दिल्यास.
पोलीस हेच जनतेचे भक्षक आहेत.
असा मेसेज संपूर्ण देशभर जाईल .
असा निर्भीड विचार निर्भय महाराष्ट्र पार्टी करत आहे.
म्हणून पोलीस अधीक्षक साहेब आपण यांच्यावर कठोरात कठोर कारवाई कराल.
आणि
कुसुरवार पोलिसांवर गुन्हे नोंदवून जनतेला योग्य न्याय द्याल.
अशी अपेक्षा निर्भय महाराष्ट्र पार्टी आपल्याकडून करत आहे.
येणाऱ्या काळात असे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राहुल बांगर हे सादर करणार आहेत.
जय हिंद..!
जय महाराष्ट्र..!
इन्कलाब जिंदाबाद..!

