महाक्रांती न्यूज नेटवर्क: – विरेंद्र चव्हाण
मेटीखेडा:-शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मेटीखेडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दिनांक 24 जुलै 2025, गुरुवारी सकाळी 11.30ते 12 वाजेपर्यंत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून मेटीखेडा येथे राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळ -वणी अप्पर तहसील मेटीखेडा मार्गावर शांततेत आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ जाहीर करणे, सातबारा कोरा आदेशाची अंमलबजावणी, तसेच इतर प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्याची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली. पावसाच्या सरींमध्येही कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने घोषणाबाजी करत होते. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर पोलीस प्रशासनाने वडगाव (जंगल )चे ठाणेदार विकास दांडे साहेब व पोलीस शिपाई यांनी ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता.

हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या मा बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने कळब तालुका सर्व पक्षीय वतीने व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले. या आंदोलनात विरेंद्र चव्हाण, (उपजिल्हधक्ष प्रहार) विशाल सरोदे,विजय तेलगे राष्ट्रवादी (शरद पवार)पांढरंकवडा तालुका, शंकर बगमारे, गुरुदेव राऊत(उबाठा) गजानन पंचबुध्ये, सुधाकर निखाडे, मेंहदिशेठ, संजय कोहीचाडे, अमोल खडसे,प्रवीण ढाकुलकर, बंडू वाघाडे, पवन जाधव, प्रशांत भोयर, मनोज राठोड, रवी चिंचाळकर, नारायण चव्हाण,सूरज जाधव कविश्व्रर गेडाम, शंकर बेंदुरे पुंडलिक राठोड, गुलाब नगराळे,बाबाराव चव्हाण,सुधाकर ठाकरे, ,रुपेश बघेल गजू खडसे,आदी सहित सर्व पक्षीय प्रहार जनशक्ती पक्ष, कांग्रेस पक्ष, उबाठा,राष्ट्रवादी (शरद पवार), बंजारा गोर शेना, मनसे, राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्ते शेतकरी आदी उपस्थित होते.. यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने भविष्यातही ठोस लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

