अहेरी तालुका प्रतिनीधी: -सुरेंद्र तावाडे
मोदुमदगु (आल्लापल्ली ) बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षानंतर आज पाऊसाने आपला रुद्र अवतार दाखविला.
अतिशय मुसळधार पावसाने मुलचेरा अल्लापल्ली मार्गांवर्ती मोडूमाडगू या गावाजवळ झाड कोसळून वाहतूक मार्ग बंद झाला. याची माहिती नागेपल्ली ग्रामपंचायत येथील सरपंच कर्तव्यदक्ष श्री लक्ष्मन कोडापे व श्री तावाडे सर यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना संपर्क साधून मार्ग सुरळीत करण्यास सांगितले.
सरपंच साहेबांनी सर्व गावातील लोकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले.

पावसाचा फटका अनेक घरांना बसला आहे, त्यातच एक घरसुद्धा कोसळले परंतु कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

