अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
मानेक टॉकीज भागातील गोपाल मार्केटस्थित एका इमारतीला आग लागल्याची घटना १९ जुलैला रात्री घडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने इमारतीमधील ३० जणांना सुखरूप बाहेर काढले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोपाल मार्केटमधील इमारतीला रात्री अचानक आग लागली. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत इमारतीमधील ३० जणांना सुखरूप बाहेर काढले.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अनुमान असून आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे दोन बंब लागले!

