महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर यांचे कार्यकर्त्यांना आव्हान….
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली शहरात एमआयएम पक्षाचे भव्य कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर साहेब, विदर्भ नेते शाहिद भाई रंगूनवाला साहेब, विदर्भ नेते कृष्णा भाऊ जाधव, निसार अहमद साहेब यांचा इंदिरा गांधी चौकात जंगी स्वागत करून ढोल ताशांच्या गजरात शक्ति प्रदर्शन करण्यात आले रॅली संस्कृती लॉन येथे पोहचल्यावर मान्यवरांचा स्वागत कऱण्यात आले या वेळी मान्यवरांनी पक्ष संघटना बळकट करून एमआयएम पक्ष प्रत्येक समाजाच्या सर्वसामान्य गोर गरीबांचे समस्या सोडवायला प्रथम प्राधान्य देण्यात यावे आणि येणाऱ्या निवडणूकीत एमआयएम पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडूण आणण्यासाठी पुर्ण ताकतीने कामाला लागावे असे आवाहन समीर साजिद बिल्डर साहेब यांनी केलं आणि गडचिरोली मध्ये लवकरच महाराष्ट्र प्रदेश इम्तियाज जलील साहेबांची सभा घेण्यात येणार आणि AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब यांना सुध्दा गडचिरोली शहरात येण्याचे आमंत्रण देण्यात येईल असे वचन दिले

या वेळी शाहिद भाई रंगूनवाला, कृष्णा भाऊ जाधव यांनी गडचिरोली चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची स्तुती करताना सांगीतले की जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांच्या नेतृत्त्वात प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते पक्षात जोडले आहे सोबतच पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला तौसिफ शेख, मुजाहिद शेख, किरणं सहारे, अयान कुरेशी, सलमान शाह, भैसारे, निजाम शेख, मारोती भोयर, याचं पक्ष प्रवेश करण्यात आले.
यावेळी एमआयएम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, शगुफ्ता शेख, जया कोंडे, सरीता बावणे,शमीना शेख युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, शाहरुख शेख सिद्दीक मन्सूरी,साजिद शेख,रमजान शेख,जुबेर खान, अनिल संतोषवार, आदि पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

