भंडारा विभाग:- प्रीतम कुंभारे
आदिवासी हलबा युवक समिती भंडारा तर्फे भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानी लाभलेले प्रा.अनिल नवलाखे, प्रमुख पाहूणे आनंदराव बावणे बँक प्रबंधक ,बँक ऑफ इंडिया लाखांदूर इतर पाहुणे भास्कर नंदनवार अनिल पराते संस्था अध्यक्ष, मनोहर हेडाऊ संयोजक, विजय पेठकर, प्रितम कुंभारे संचालक पी. एस. कॉम्पुटर , चेतन सोनकुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री .माँ दंतेश्वरी माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले .मार्च 2024 दहावी -बारावी बोर्डाच्या परीक्षेत चिन्मय उमाकांत धकाते भंडारा 97 % , सोनाक्षी अरुण धका ते भंडारा 96.80%, कुमुद प्रदीप बोकडे 92 %, दृष्टी ऋषी खोत भंडारा 92 %, वेदिका राधेश्याम सोणकुसारे अंधाळगाव 89.20%, कृपाली नरेंद्र बावणे मोहाडी 92 % , यामिनी राजेश डेकाते मोहाडी 92.80%, आयुषी घनश्याम श्रीपाद मोहाडी 88.40 %, वांशिक विश्वनाथ डेकाटे मोहाडी 85.40% सुरेश पीतांबर बारापात्रे भंडारा 76%, तनुक्षा रमेश कोहाड भंडारा 76 %उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच गुणगौरव करून सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पराते यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोहर हेडाऊ यांनी केले कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित वेगवेगळ्या गावचे पाहून मंडळी उपस्थित होते.



