कंधार प्रतिनीधी । ज्ञानेश्वर कागणे.
कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील स्वातंत्र्यपूर्व काळापासुन दफन स्मशानभुनी (रामटेक) कडील पुर्ननिर्माण करून कायम स्वरूपी स्मशानभूमिसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व तहसिलदार तसेच लोहा-कंधार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा चिटणीस बालाजी गंगाराम पा.पेठकर यांनी केली आहे.

बहाद्दरपुरा येथील ग्रामस्थ हे पुर्वीपार काळा पासुन रामटेक गावठाण मधील स्मशानभुमी मध्ये परंपरे नुसार दफन विधी करत होते, परंतु सदरील स्मशानभुमी मध्ये पाणी येत,असल्यामुळे ग्रामस्थ सध्या पुलाकडील स्मशानभुमी मध्ये पुर्वीपार परंपरा तोडुन नाईलाजास्तव अग्णीव्दारे अंत्यसंस्कार करीत आहे. त्यामुळे नागरीकांना अंत्यविधीसाठी अडचणीस समोर जावे लागत आहे.
गावांतील व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यास या अडचणीस येत आहे. मिळेल त्या ठिकाणी अंतिम संस्कार करावे लागत असून लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे पुर्ननिर्माण करून कायम स्वरूपी स्मशानभूमिसाठी उपलब्ध करून देऊन महत्त्वाची समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे.जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दि.११ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर बहादरपूर येथील ४५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

