विद्यार्थी दशेतच विवेकी विचारसरणी रूजवून भारतीय संविधानातील भारतीय नागरीकांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अन्तर्गत महाराष्ट्र विवेक वाहिनी महाराष्टातील ६८ महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे याचाच पुढचा टप्पा म्हणून पाच ते बारा वर्गातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचे उद्घाटन कमला नेहरू माध्यमिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात नुकतेच करण्यात आले
यावेळी मंचावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार , शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचे प्रमुख दिलीप गुळघाणे मुख्याध्यापिका सौ.मैथिली मुळे , सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण प्रबोधन चळवळीचे पत्रकार देशमुख यांची प्रमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
याप्रसंगी गजेंद्र सुरकार यांनी भारतीय नागरिकांचे कर्तव्य असलेले व मुल्य शिक्षणाचा आशय व राष्ट्रीय विज्ञान धोरणाचा भाग असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे,मन व शरीर निरोगी राहण्यासाठी रोज व्यायाम करणे, आरोग्य सुदृढ राहण्यासाठी व्यसनापासून दूर राहणे, अभ्यासक्रमा व्यक्ती रिक्त बौध्दीक वाचन करने,एकतरी खादीचा सदरा घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे व कामगारांच्या श्रमाशी स्वतःला जोडून घेणे हे विवेक वाहिणीचे मुल्य असलेल्या मुल्यांची माहिती दिली तर दिलीप गुळघाणे यांनी विद्यार्थ्यांना बोलते करून श्रीमंत मजूर कष्टकरी यातील भेदभाव समजावून सांगत जिवणात श्रमाचे महत्त्व विशद केले आपण कोणाच्या किती कामी पडतो हे महत्त्वाचे मुल्य जिवणात रूजविल्यास माणूस म्हणून आपली ओळख निर्माण होते.
यासोबतच साधी राहणी, नेहमी सहकार्याची भूमिका,पर्यावरण रक्षण,वयात स्वभावात होणारे बदल अहिंसक विचारसरणी आदीवर विद्यार्थीसोबत हसत खेळत संवाद साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा आदेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ ममता वैरागडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली गुळघाणे,सौ.वर्षा उईके,श्रीमती स्मिता खुजे सौ.हेमलता नारायणे,सौ.विजया कातोरे,सौ.मनिषा करलुके यांनी परिश्रम घेतले

