अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:-तालुक्यातील वाटखेड येथे दि.१०/०७/२०२५ च्या रात्री १२ ते २ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन घराच्या दरवाज्याच्या कड्या तोडून ७७६८०/- रुपयाचे सोन्याचे दागिने व नगदी २६५००/- रोख रक्कम असा एकूण १०४१८०/- रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास आहे.
फिर्यादी नामे सुनील प्रभाकर गुजर वय ५० रा. वाटखेड फिर्यादी च्या जबानी रिपोर्ट वरून अप क्रमांक २७६/२०२५ कलम ३३१(४) ३०५(A)BNS सदरचा गुन्हा नोंद केला आहे,सदर पांढरकवडा अधिकारी SDPO,पोलीस निरीक्षक राळेगाव शितल मालटे,सपोनि योगेशकुमार दंदे यांनी भेट दिली तसेच पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशन करित आहे

