शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पुसद तालुक्यातील निंबी ते गाजीपुर रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्याने मुरूम व गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आली पार्डी येथे रस्त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याने रस्ता असा चिखलमय झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने या चिखल्मय रस्त्याने पायदळ जाणे ही कठीण झाली आहे अनेक वाहनधारकाचे छोटे-मोठे अपघातही झाले आहे

शाळाकरी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत आहे संबंधित विभागाने लक्ष देऊन या रस्त्यावर गिट्टी व चुरी टाकून तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पार्डी गणेशपुर गोरेवाडी गाजीपुर येथील नागरिक करीत आहे

