अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
आम आदमी पक्षाच्या वतीने महानगरध्यक्ष अल्हाद मसूद अहेमद खान यांच्या नेतृत्वात मनपा समोर 7 जुलैपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात मनपाचे अधिकाऱ्यांनी मंडपात येऊन उपायुक्त गीता ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा निरोप दिला होता.

त्यावरून उपायुक्त गीता ठाकरे यांची भेट करून चर्चा केली असता ती चर्चा निष्फळ ठरली त्यामुळे आजही उपोषण सुरु होते. यानंतर उपायुक्त ठाकरे यांनी आंदोलकांना फक्त टॅक्स बाबत लेखी पत्र देऊन आंदोलन न करण्याचे कळविले आहे. मात्र, मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवाण्याचा निश्चय आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी केला आहे.

