रायगड जिल्हा प्रतिनिधी:-कैलासराजे घरत
गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:।।
सद्गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री सद्गुरूवे नम:।।
श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा येथे गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळपासूनच भाविक भक्तांची स्वामी समर्थांच्या मंदिरात
दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांग लागली होती. रांगेत उभे राहून भक्तगण दर्शन घेत होते. श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ..असा जयघोष करत भाविक भक्तीत तल्लीन झाले होते.
स्वामी समर्थांचे मंदिर गाभारा सुंदर फुलांनी संजविला होता.
स्वामी समर्थांची मूर्ती अतिशय विलोभनीय दिसत होती.
ते रूप भक्तगण डोळ्यात साठवून ठेवत होते.

मंदिरात स्वामी समर्थांच्या पादुकांचे आणि पालखीचे भक्त दर्शन श्रद्धेने आणि भक्तिभावाने घेत होते. संपूर्ण मंदिर परिसर भाविक भक्तांनी भरून गेला होता. आपटा, खारपाडा, तारा, डोळघर, कासारभट, साई तसेच जिते परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने गुरू पौर्णिमा उत्सवानिमित्त उपस्थित होते. पेण तालुका, पनवेल तालुका तसेच मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील अनेक स्वामी समर्थांचे भक्तगण आवर्जून गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्यास उपस्थित होते. सर्व भाविकांना प्रसाद आणि महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती. त्याचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.
या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन्मानित पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थांचे चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा आजीव विश्वस्त समिती श्री.ओमप्रकाश परांजपे साहेब,श्री.अजित कारखानीस, श्री.शैलेंद्र महाशब्दे, अध्यक्ष श्री.एस.डी.काटकर, उपाध्यक्ष श्री.आशिष कोचरगावकर, श्री.सचिव बाळकृष्ण मोरे, श्री.नंदू पटवर्धन, श्री.रमेश महाशब्दे, सौ.सुचित्राताई समेळ, श्री.प्रदीप मोहिते, प्रवीण काटकर आणि सर्व ट्रस्टी उपस्थित होते.

पाताळगंगा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात श्री स्वामी समर्थांचे हे मंदिर वसले असून.. बाजूलाच साईबाबा, गगनगिरी महाराज, विठोबा रखुमाई, नदीच्या तीरावर हनुमानाचे मंदिर अशी इतर छोटी मंदिरे आहेत. अनेक भक्तगण येथे नित्यनेमाने येत जातात. प्रत्येक गुरुवारी आरती नंतर महाप्रसाद(अन्नछत्र) वाटप करण्यात येत आहे. तसेच अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत गरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, नेत्र तपासणी शिबिर असे अनेक उपक्रम
राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी या कार्यात सहभागी होऊन मदतीचा हात द्यावा स्वामी समर्थ नक्कीच आपल्याला भरभरून देतील.असे आवाहन पत्रकार कैलासराजे घरत यांनी केले आहे.

