जिल्हा प्रतिनिधी :-मोहसीन खान
भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “गुरुपौर्णिमा उत्सव” साजरा केला जात आहे. याअंतर्गत समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे.
भाजपा लातूर शहराच्या वतीने विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ॲड.संजयजी पांडे, सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून असंख्य रुग्णांवर शस्त्रक्रिया व विविध सामाजिक उपक्रम राबवणारे डॉ. हनुमंत किनीकर व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ब्रह्माकुमारीज संस्थेच्या राजयोगिनी महानंदा बहनजी, पुण्या बहनजी यांचा सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश समाजासाठी प्रेरणास्थान ठरलेल्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणे हा आहे. असे उपक्रम तरुण पिढीला सकारात्मक दिशा देतात आणि आदर्श जीवनमूल्यांची जाणीव करून देतात.

