विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
राज्यातील 11 संघटनेच्या कामगारांच्या वतीने आशा,गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोषण आहार, अंगणवाडी सेविका मदतनीस,अशा अनेक संघटित असंघटित कामगारांच्या वतीने एक दिवसीय संप पुकारला केंद्र सरकारने आरोग्य खात्यात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना किमान वेतन पंचवीस हजार रुपये दरमहा देण्याचे आश्वासन माननीय मोदी साहेब यांनी केले होते
पण कुठल्याही प्रकारचे मानधन त्यांना अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही तसेच उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची मानधन वाढ केंद्र सरकारकडून अजून पर्यंत झालेली नाही मागील अकरा वर्षापासून केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका ,शालेय पोषण आहार ,अंशकाली स्त्री परिचर , यांना कुठल्याही प्रकारचे वाढ केलेली नाही आहे
त्याच्या निषेधार्थ हा संप पुकारला गेला आहे तसेच या सरकारने जे कामगार मोर्चे काढतील आंदोलन करतील सरकारच्या विरोधात नारे लावतील घोषणा देतील त्यांना नक्षलवादी म्हणून तुरुंगात टाकण्याचा जो निर्णय या ठिकाणी जन सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे
त्या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आयटक संघटनेच्या वतीने देशातील सर्व कामगारांच्या वतीने आम्ही त्या कायद्याचे विरोध करत आहोत खऱ्या अर्थाने स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या घोषणा त्यांनी केल्या होत्या त्या अजून पर्यंत त्यांनी दिला नाही सरकारने निवडणुकीच्या आधी आश्वासने दिली होती
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्ज मुक्त करू त्यांना हमीभाव देऊ पण अशा कुठल्याही आश्वासन सरकारने पाळलेले नाही सरकारने जर या कामगारांना कष्टकऱ्यांना योग्य न्याय दिला नाही तर यासमोर बेमुदत संप हे कामगार करतील आणि रस्त्यावरची लढाई लढतील आणि त्यातून होणाऱ्या अडचणींना आरोग्य व्यवस्था आहार व्यवस्था अशा विविध व्यवस्था जर ढासळल्या तर त्याला सरकार सर्वस्वी जबाबदार राहील

शबाना शेख, अश्विनी मल्हारकर ,जयश्री देशमुख, ,कविता भोगे ,विशाखा गणवीर, विमल सोनवणे ,संध्या टेंभरे, शिल्पा मेंढे, छबु नेहारे, सविता वाघ, वंदना उरकुडकर, वंदना नौकरकर, अरुणा खैरकार, नंदा महाकाळकर, रेखा तेलतुमडे, शालीनी थुल ,दुर्गा वाघमारे,प्रेमिला वानखेड़े, मंजू शेंडें, पुष्पा शंभरकर,उज्वला नाखले, आम्रपाली बुरबुरे,प्रतिभा वाघमारे, हर्षा डवरे,वैशाली निमसडे, योगीता चोरे, अस्मिता वरखेडे, वनिता खडसे, , गिता मडावी,वर्षा पाल, दीक्षा महाजन, मीनल निघोट, रूपाली बावणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडला.








