राळेगाव ते वणी बस चार तास ब्रेक डाऊन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव एस टि आगार उतप्नाच्या बाबतीत त प्रथम क्रमांक मारतो पण येथील काही लालपरी बसची दयनीन अवस्था झाली आहे आज रोजी राळेगाव ते वणी जानारी बस क्रमांक mh 39 n 8942 हि बस सावनेर येथे बंद पडली . प्रवाशांना या बसस्थानकावर चार तास ताटकळत बसावे लागले . राळेगाव एस टि आगाराचे आगार प्रमुख हे यवतमाळ वरुन अपडाऊन करतात त्यांचे आगाराकडे दुर्लक्ष होत आहे संपुर्ण कारभार येथील चालक वाहक हे करत असतात येथील आगारकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे.








